जिल्ह्यात आज कोरोनाचे १०१ रुग्ण वाढले

Foto
जिल्ह्यात १०१ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले.
आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाँइंटवरील ४ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १२१२६ कोरोनाबाधित आढळले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ६६९० रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर जिल्ह्यात आतापर्यंत ४१७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर सध्या ५०१९ जणांवर उपचार सुरु आहेत. 
शहरात आढळले ८० रुग्ण
शहरात ८० रुग्ण आढळून आले आहेत. त्यात विठ्ठलनगर २, गांधीनगर १०, दलालवाडी २, रामनगर ६, सावित्री नगर, हर्सुल ६, कुंभार गल्ली, हर्सुल १, पडेगाव ४, स्वामी विवेकानंदनगर ३, कैसर कॉलनी २, टाइम्स कॉलनी १, अविष्कार कॉलनी, एन सहा १, पुंडलिकनगर १, छावणी १, पदमपुरा १, क्रांतीनगर १, बन्सीलालनगर ४, बनेवाडी ३, छावणी १, मयूरपार्क १, उस्मानपुरा १, शिवशंकर कॉलनी ५, गुलमोहर कॉलनी, एन पाच २, विश्व भारती कॉलनी २, हनुमाननगर, गल्ली नं. पाच १, विष्णूनगर १, ठाकरेनगर, एन दोन सिडको २, एन दोन, जिजामाता कॉलनी १, बालाजीनगर २, एसआरपीएफ परिसर १, हिमायतबाग परिसर २, जवाहर कॉलनी १, सिल्क मिल कॉलनी १, गणेशनगर १, एसबी मुलांचे वसतिगृह परिसर १, दर्गा रोड परिसर १, देवगिरीनगर, सिडको २, इतर २ या भागातील रुग्ण आढळून आले.
ग्रामीण भागातील १७ रुग्ण
ग्रामीण भागातील १७ रुग्ण आढळून आले. कन्नड १, साराभूमी परिसर, बजाजनगर २, वडगाव, बजाजनगर २, इंद्रप्रस्थ कॉलनी १, राजवाडा, गंगापूर २, इंदिरानगर, वैजापूर १, इंगळे वस्ती, वैजापूर १, घायगाव १, परदेशी गल्ली, वैजापूर १, कमलापूर १, अंभई १, प्रसादनगर, सिल्लोड १, रांजणगाव २ या भागातील रुग्ण आढळून आले. 
सिटी एंट्री पॉइंटवरील ४ रुग्ण
सिटी एंट्री पॉइंटवर ४ रुग्ण आढळून आले. त्यात छावणी १, इतर ३ या भागात रुग्ण आढळून आले.
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शहरात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील एका खासगी रुग्णालयात बीड बायपास रोडवरील ६४ वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात वंजारवाडीतील ७० वर्षीय स्त्री आणि ८० वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.